‘एम्पायर’ ५० महान अभिनेत्यांच्या यादीत ‘या’ एकमेव भारतीय अभिनेत्याचा समावेश
बॉलीवूडचा बादशाह, शाहरुख खानचे चाहते केवळ भारतातचनव्हे तर जगभर पसरले आहे यात शंका नाही. जगभरातील प्रेक्षकांचे या अभिनेत्यावर प्रेम असून, त्याचा सम्मान करतात. तसेच, आपल्या अभिनय कौशल्याने तसेच उत्कृष्ट स्क्रीन प्रेझेन्स आणि नम्रतेने शाहरुख खानने वेळोवेळी प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. अशातच, जगातील सर्वात अग्रगण्य मॅगझिन्सपैकी ‘एम्पायर’ने (EMPIRE)आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीत स्थान मिळवणारा शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे.
नुकतीच ही यादी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत EMPIRE मॅगझीनने आतापर्यंतच्या टॉप 50 महान अभिनेत्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी लिहिले, “Empire’s list of the 50 greatest actors of all time – revealed! As celebrated in our brand new issue, and voted for by you.”
या यादीमध्ये आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, ज्यामध्ये शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता आहे. याशिवाय या यादीत डेन्झेल वॉशिंग्टन, टॉम क्रूझ, फ्लॉरेन्स प्यू आणि टॉम हँक्स या अभिनेत्यांचादेखील समावेश आहे. अशातच, सध्या शाहरुख खान जानेवारीमध्ये ‘पठाण’ आणि त्यानंतर ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांच्या रिलीजसाठी तयारी करत आहे.
Empire's list of the 50 greatest actors of all time – revealed! As celebrated in our brand new issue, and voted for by you.
READ NOW: https://t.co/zvvo1xpYhn pic.twitter.com/zE4jZmVMSj
— Empire Magazine (@empiremagazine) December 19, 2022