google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

lee sun kyun : ‘पॅरासाइट’ फेम अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

Lee sun kyun Found Dead: २०२० साली ‘पॅरासाइट’ हा कोरियन चित्रपट ऑस्करमुळे चांगलाच चर्चेत होता, उत्तम दिग्दर्शन, उत्तम पटकथा, उत्तम फॉरेन फिल्म आणि उत्तम चित्रपट असे चार ऑस्कर त्यावेळी ‘पॅरासाइट’ने पटकावले. आता या चित्रपटातील कलाकाराबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्रपटात पार्क-डोंग इक हे महत्त्वाचं पात्र साकारणाऱ्या ली सन-क्यून या अभिनेत्याचा मृतदेह बुधवारी सापडला आहे.

‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार दक्षिण कोरियामधील सोल शहरात एका पार्किंग लॉटमध्ये ली सन-क्यूनचा मृतदेह आढळला आहे. गेल्या काही दिवसांपासून ली सन-क्यून हा अवैध ड्रग्जचे सेवन करण्याच्या प्रकरणात अडकला होता ज्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. यामुळे तो चांगलाच चर्चेत होता. या प्रकरणामुळेच त्याने स्वतःला संपवलं असल्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे.

या प्रकरणात आपली बाजू मांडताना एका नाइट क्लबमध्ये चुकून ड्रग्ज घेतल्याचं ली सन-क्यूनने कबूल केलं होतं. या प्रकरणात तो दोषी नसल्याचं दावा तो करत होता. २७ डिसेंबरला त्याचा मृतदेह स्वतःच्याच कारमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मरण्याआधी त्याने एक पत्र लिहिल्याचं त्याची पत्नी योनहॅपला मिळालं अन् तिने आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच तातडीने पोलिसांत याबद्दल खुलासा केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!