google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘लव्ह सेक्स और धोखा 2’ची लवकरच घोषणा?

2010 मध्ये, एकता आर कपूर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी डिजिटल टेक्नोलॉजीचा प्रभाव दर्शवत ‘लव्ह सेक्स और धोखा’हा एक्सपेरिमेंटल चित्रपट दर्शकांच्या भेटीला आणला होता. ज्यामध्ये एमएमएस स्कॅन्डल, ऑनर किलिंग आणि स्टिंग ऑपरेशन्स अशा विषयांवर प्रकाश टाकला होता. म्हणजेच, ज्यावेळी इंडस्ट्रीत रन-ऑफ-द-मिल सिनेमा बनवले जात होते, तेव्हा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पावरफुल फिमेल प्रोड्यूसरने काहीतरी अनोखे करण्याचे धाडस केले.

दरम्यान या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल अनेक अंदाज लावले जात आहेत. अशातच, एकता आर कपूर आणि दिबाकर बॅनर्जी बालाजी टेलिफिल्म्सचा पुढील चित्रपट ‘लव्ह सेक्स और धोखा 2’ची घोषणा करण्यासाठी बिग बॉस 16 च्या घरात प्रवेश करणार असल्याच्या अफवा आहेत.

शोचे अनोखे नेचर लक्षात घेता, जे नुकतेच देशाचे गिल्टी ऑब्सेशन बनले आहे, असे म्हणू शकतो की निर्माते या संधीकडे एक स्मार्ट मार्केटिंग मूव्ह म्हणून पाहत आहेत. यात आश्चर्य नाही, कारण एकता आर कपूर नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटवर आपली पकड राखण्यासाठी ओळखली जाते तसेच, त्यांनी आपल्या प्रवासात शार्प इंट्यूशन आणि बिझनेस कौशल्य दाखवले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!