‘फर्जी’मध्ये राशीने साकारली ‘हि’ व्यक्तिरेखा…
या सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर करत राशी खन्ना म्हणाल्या, “‘फर्जी’च्या कास्ट आणि क्रू सोबत काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता. आपल्या कामाबद्दल अतिशय भावुक असलेल्या सरकारी अधिकाऱ्याची भूमिका साकारताना मला खूप मजा अली. मला नेहमी परफॉर्मन्स ओरिएंटेड भूमिका करायच्या होत्या. आणि जेव्हा उत्तम थ्रिलर कंटेंट बनवण्यासाठी ओळखले जाणारे राज आणि डीके सारखे निर्माते तुम्हाला ‘फर्जी’सारखे काहीतरी ऑफर करतात, तेव्हा तुम्हाला फक्त संधी पकडायची असते. शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांसारख्या प्रतिभावान अभिनेत्यांसोबत एकाच फ्रेममध्ये असणे माझ्यासाठी खूप रोमांचक होते. मी प्राइम व्हिडिओवर ‘फर्जी’लाँच होण्याची वाट पाहत आहे, जिथे आमचे काम जगभरातील दर्शकांपर्यंत पोहोचेल.”
‘फर्जी’ही आठ भागांचा क्राईम थ्रिलर सिरीज आहे ज्यामध्ये राज आणि डीके यांच्या सिग्नेचर ह्युमर पाहायला मिळणार असून, एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टच्या नजरेतून एलीट क्लासची बाजू घेणाऱ्या सिस्टमला फेल करण्याचा प्रयत्न दाखवला आहे. अशातच, ‘फर्जी’ही सिरीज 10 फेब्रुवारीपासून प्राइम व्हिडिओवर भारत आणि 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होईल.