google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडा

शुबमन ठरला जगातील सर्वात तरुण द्विशतकवीर

शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले. त्याने ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, त्यानंतर त्याने १४५ चेंडूत पहिले द्विशतक पूर्ण केले. यासह तो वनडे फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध हा विक्रम करणारा सहकारी इशान किशनचा विक्रम मोडला. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ८ बाद ३४९ धावांचा डोंगर उभारला.

शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात लॉकी फर्ग्युसनला सलग तीन षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले. गिल १४९ चेंडूत २०८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीत त्याने १९ चौकार आणि ९ षटकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३९.६०चा होता. त्याचबरोबर शुबमन द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा (३ वेळा), वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, इशान किशन यांनी द्विशतके झळकावली आहेत. दरम्यान, द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाजही ठरला आहे. त्याने याबाबतीत इशान किशन आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला. गिलने २३ वर्षे, १३२ दिवसांत, तर इशानने २४ वर्षे, १४५ दिवसांत आणि रोहितने २६ वर्षे, १८६ दिवसांत ही कामगिरी केली.

सलामीवीर शुबमन गिलच्या (२०८ धावा) पहिल्या द्विशतकामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ बाद ३४९ धावा केल्या. गिलने आपल्या खेळीत १४९ चेंडूंचा सामना केला आणि १९ चौकार आणि ९ षटकार लगावले. त्यांच्याशिवाय भारताकडून रोहित शर्माने ३४ आणि सूर्यकुमार यादवने ३१ धावांचे योगदान दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!