google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

IFFI 53 : जीन-लुक गोडार्ड यांना सिनेआदरांजली

इफ्फी-53 प्रसिद्ध फ्रेंच-स्विस चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि चित्रपट समीक्षक जीन-लुक गोडार्ड यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे आणि या दिग्गज चित्रपट कर्मीने बनवलेल्या काही अनमोल चित्रपटांचा नजराणा हे यंदाच्या इफ्फी चित्रपट महोत्सवाचा परमोच्च आकर्षण बिंदू ठरणार आहे.

आशियामधल्या या सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचं यंदाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, फ्रान्सला फोकस कंट्री बनवण्यात आलं असून (केंद्रस्थानी ठेवून), यामध्ये फ्रेंच चित्रपटांचा उत्सव साजरा होणार आहे, आणि गोडार्ड हे निःसंशयपणे, फ्रेंच सिनेमावर आपला ठसा उमटवणारं एक व्यक्तिमत्त्व आहे! फ्रँकोइस ट्रुफॉट, अॅग्नेस वर्दा, एरिक रोहमर आणि जॅक डेमी यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसोबत 1960 च्या फ्रेंच न्यू वेव्ह चित्रपट चळवळीचे प्रणेते म्हणून गोडार्ड प्रकाशझोतात आले. युद्धोत्तर काळातील ते सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्माते होते.

चित्रपट समीक्षक म्हणून आपल्या उमेदवारीच्या काळात, कॅहियर्स डु सिनेमा या प्रभावशाली मासिकासाठी चित्रपट समीक्षक म्हणून काम करताना, गोडार्ड यांनी मुख्य प्रवाहातील फ्रेंच सिनेमाच्या ‘दर्जाच्या परंपरे’वर टीका केली, आणि नवोन्मेष आणि प्रयोगशीलतेवर भर दिला. प्रत्युत्तर म्हणून, त्यांनी आणि त्यांच्या समविचारी समीक्षकांनी फ्रेंच सिनेमांसह पारंपरिक हॉलीवूड चित्रपटांच्या  परंपरांना आव्हान देणारे चित्रपट स्वतः बनवायला सुरुवात केली. त्याचं काम चित्रपट इतिहातील संदर्भांचा वारंवार वापर करून, त्यांचा आदर करते  तसंच आपला राजकीय दृष्टीकोन प्रदर्शित करतं. यंदाच्या वर्षी 13 सप्टेंबर रोजी जगाने हे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व गमावले.

इफ्फी 2022 मध्ये प्रदर्शित होणार्‍या गोडार्ड-दिग्दर्शित काही उत्कृष्ट कलाकृती पुढीलप्रमाणे :

अ वूमन इज अ वूमन/ Une femme est une femme – 1961 चा हा क्लासिक चित्रपट नृत्यांगना एंजेला आणि तिचा प्रियकर एमिल यांच्या नात्या भोवती फिरतो. एंजेलाला मूल हवं आहे, पण एमिल त्यासाठी तयार नाही. एमिलचा जिवलग मित्र आल्फ्रेड देखील म्हणतो की त्याला अँजेला आवडते आणि हळूवारपणे ते सांगत राहतो. एमिलने मुलासाठीची विनंती निष्ठुरपणे नाकारल्यामुळे, अँजेला शेवटी अल्फ्रेडची विनंती स्वीकारण्याचा निर्णय घेते आणि त्याच्याबरोबर संबंध ठेवते.

अल्फाव्हिले / une étrange aventure de Lemmy Caution-  1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमेरिकेने, अल्फाव्हिल या अंतराळातल्या दूरच्या शहरात पाठवलेल्या एका गुप्तहेरला एका हरवलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे, आणि आपल्या शहराला त्याच्या अत्याचारी शासकापासून मुक्त करायचं आहे.

ब्रेथलेस/ À bout de souffle या चित्रपटाने 1960 मध्ये बर्लिन महोत्सवात  गोडार्डला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवून दिला. या क्लासिक चित्रपटात एका भुरट्या चोराचे साहस पाहायला मिळते, जो एक गाडी  चोरतो आणि भावनेच्या भरात मोटारसायकलवरच्या पोलिस कर्मचार्‍याची हत्या करतो.

कंटेम्प्ट / Le Mépris- 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात, पॉल जावल  हा एक तरुण फ्रेंच नाटककार  आणि त्याची पत्नी कॅमिली यांच्या जीवनात काय घडतं ते पहायला मिळेल, जेव्हा पॉल अश्लील अमेरिकन निर्माता जेरेमी प्रोकोशची नाट्य संहिता पुन्हा तयार करण्याचा प्रस्ताव स्वीकारतो.

गुडबाय टू लँग्वेज/ Adieu au Langage- या दिग्गज चित्रपट कर्मीने 2014 मध्ये हा  कथानकावर आधारित प्रायोगिक 3D चित्रपट बनवला. हा गोडार्डचा 42 वा फिचर आणि 121 वा फिल्म अथवा व्हिडीओ प्रकल्प आहे.

विशेष म्हणजे, गोडार्डचा स्वतःचा कुत्रा रॉक्सी मिविले या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे!

पायरोट द फूल/ Pierrot Le Fou- 1965 मध्ये प्रदर्शित झालेला हा आणखी एक क्लासिक चित्रपट. या चित्रपटाचं कथानक फर्डिनांड ग्रिफॉन याच्या भोवती फिरतं, जो आपल्या वैवाहिक जीवनात दुःखी आहे, आणि नुकतंच त्याला नोकरीवरून काढून टाकलं आहे. एका उथळ पार्टीमध्ये गेल्यावर त्याला पळून जावंसं वाटतं आणि तो आपली पत्नी, मुलं आणि मध्यमवर्गीय जीवनशैली सोडून, मारियान रेनोईर या आपल्या माजी प्रेयसी बरोबर, पळून जाण्याचा निर्णय घेतो! पुढे काय घडलं, ते पहा.

सी यु फ्रायडे, रॉबिन्सन/ À vendredi, Robinson-  मित्रा फराहानी यांनी 2022 मध्ये दिग्दर्शित केलेल्या या फ्रेंच-स्विस माहितीपटात, जीन-ल्यूक गोडार्ड स्वतःचे दैनंदिन विचार मांडताना दिसतात आणि स्वित्झर्लंडमधून आपले शब्द आणि प्रतिमा पाठवतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!