google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

मध्यवर्ती ग्रंथालयात २१ पासून ग्रंथोत्सव

 पणजी :

 ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचनसंस्कृतीमध्ये वाढ व्हावी व ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त‍ व्हावेत, यासाठी कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयात २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाटो येथील संस्कृती भवनाच्या पहिल्या मजल्यावर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० वाजेतो या ग्रंथोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. २१ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यामध्ये राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, राज्यातील तसेच इतर राज्यातील प्रकाशक व ग्रंथविक्रेते यांचा सहभाग असणार आहे.   

ग्रंथप्रदर्शन आणि ग्रंथ विक्री असे सामाईक स्वरूप असलेल्या या ग्रंथोत्सवात राज्यातील सर्व ग्रंथप्रेमीनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!