ज्योएल आंद्रादे, विवेक डिसील्वा प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी
गोवा काँग्रेसने युवक काँग्रेसच्या (goa congress) अध्यक्षपद व उपाध्यक्षपदाची नावे जाहीर केली आहेत. अध्यक्षपदी ज्योएल आंद्रादे तर उपाध्यक्षपदी विवेक डिसील्वा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनीवास बी. व्ही यांनी ही नियुक्ती केली आहे. याबाबतची माहिती गोवा प्रदेश युवक काँग्रेसने ट्वीट करत दिली.
ज्योएल आंद्रादे हे गोवा प्रदेश काँग्रेस (goa congress) पणजी ब्लॉकचे अध्यक्ष आहेत. आता त्यांची वर्णी गोवा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी लागली आहे. विवेक डिसील्वा हे उत्तर गोवा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आता त्यांची वर्णी गोवा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी लागली आहे. याबाबतचे पत्र भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनीवास बी. व्ही यांनी जाहीर केले.
Hearty Congratulations to Joel Andrade @JoelSAndrade on being elected as Goa Pradesh Youth Congress State President and Vivek D’silva @DsilvaVivek on being elected as Goa Pradesh Youth Congress State Vice President.
We wish you good luck for future endeavours. pic.twitter.com/mjZBiJMQPr
— Goa Pradesh Youth Congress (@IYCGoa) December 25, 2022
प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तुमची नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. मला विश्वास आहे की तुम्ही कठोर परिश्रम कराल. तुमचा पूर्ण वेळ आणि शक्ती काँग्रेस पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली समर्पित कराल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.