शाहू नगरात ‘पाणीबाणी’
सातारा (महेश पवार) :
सातारा शहराला लागूनच असलेल्या शाहूनगर मध्ये गेल्या एक आठवड्यापासून पाण्याची भीषण टंचाई असून परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते . या परिसरात इतर वेळी पाचशे रुपयाला मिळणारा टँकर मात्र या पाणीटंचाईचा गैरफायदा घेत या परिसरातील लोकांकडून एक ते दीड हजार रुपये घेऊन नागरिकांची लूट करत आहे . वारंवार तक्रार करून देखील प्रशासनामार्फत या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात टँकर मार्फत पाणीपुरवठा करणे गरजेचे असताना देखील या ठिकाणी प्रशासनाच्या आणि प्राधिकरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे शाहूनगरवासीयांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
मात्र गेल्या आठवड्यापासून शाहूनगरवासीयांना वापरासाठी सोडा पण पिण्यासाठी पाणी नाही म्हणून तडफडत आहेत, तरी देखील प्रशासनाचं आणि नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याची तक्रार स्थानिक करत आहेत.