
बैलगाडा शर्यतीत दोन बैलांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू!
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक काका धुमाळ यांनी बैलगाडा शर्यतीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते.
मात्र आज दुपारच्या सुमारास बैलगाडाने शर्यत सुरु असतानाच बैलगाडी ने चाकोरी सोडली आणि थेट कृष्णा नदी पात्रात बैलगाडा गेल्याने दोन बैलांचा जागीच मुत्यू झाल्याची घटना घडली असून यामध्ये बैलगाडा चालकाने वेळीच उडी टाकल्याने तो बचावला.
मात्र यामध्ये दोन बैलांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला, ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास घडली असून या घटनेने बैलगाडा शौकीनमध्ये नाराजगीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खा उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त तांदुळवाडी येथे घेण्यात आलेली बैलगाडा शर्यत वादाच्या भोवऱ्यात सापडली असून , कोरेगावच्या तहसीलदारांनी शंभर मिटर अंतरावर नदी असताना,नदी काठावर शर्यत घेण्यासाठी परवानगी दिलीच कशी , यामुळे कोरेगावच्या तहसीलदार आणि आयोजक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून होऊ लागली आहे.