google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

BPCLच्या कारंडवाडीच्या कारवाईचे नेमकं गौडबंगाल काय?

सातारा (महेश पवार):

येथील एम आय डी सी येथील कारंडवाडी येथे वाईकर कॉलनी येथे बेकायदेशीर गॅस साठा प्रकरणी कारवाई करण्यात आली , या बेकायदेशीर गॅस साठा प्रकरणी BPCL चे सेल्स ऑफिसर दिवज्योत सिंग यांना वाढे फाटा येथे बेकायदेशीर गॅस साठा वाहतूक करताना दिसल्यावर पाठलाग करत कारंडवाडी येथील वाईकर कॉलनी येथे सोनू ,अशोक ,कृष्णा विष्णोई यांना गॅस वाहतूकी संबंधी विचारणा करण्यासाठी गेले असता ते पळून गेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सदर ठिकाणी भारत गॅस ६१ , इंन्डेन २१ एचपी ३ सिलेंडर टाक्या जप्त केल्या आणि वापरत आलेल्या गाड्या ही जप्त करण्यात आल्या . हे सगळं होतं असताना खरं तर BPCL च्या अधिकारी यांनी फक्त वाहतूक करताना पकडले खरं पण त्यांनी स्वतः जबाबदारी ने तक्रार न देता सातारा येथील पुरवठा अधिकारी यांना तक्रार देण्यास सांगितले आणि स्वतः बॅकफूटवर थांबले खरं तर त्यांनी स्वतः कंपनीचा जबाबदार अधिकारी म्हणून तक्रार देवून संबधितानी नेमके सिलेंडर टाक्या कोठून आणल्या ?त्या चोरीच्या आहेत का? एवढे सिलिंडर नेमके भरुन कोण देतं ? यांचा तपास करण गरजेच असताना देखील या प्रकरणी अधिक चौकशी का? केली गेली नाही यामुळे या सर्वांचे कनेक्शन फिरुन BPCL कडे जाते . म्हणून आम्ही संबंधित अधिकारी दिवज्योत सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार देत उडवा उडवीची उत्तरे देत उलट सवाल करत टोलवाटोलवी केली .

घरगुती सिलिंडर स्वस्त असल्याने तो कमर्शियल गॅस मध्ये भरून विक्री करणाऱ्या या परराज्यीय टोळीचे BPCL शी नेमकं कनेक्शन काय आहे ? नेमकं कोण पुरवठा करते यांना घरगुती सिलेंडर टाक्याचा ? कोणाच्या मदतीने हा प्रकार सुरू असुन कारंडवाडीच्या कारवाईत BPCLचे सेल्स अधिकारी दिवज्योत सिंग यांचं तक्रारीत तक्रारदार न होणं यामागचे कारण काय याचा शोध घेणं देखील गरजेचे आहे . यानंतर कारंडवाडी येथे झालेल्या कारवाईचे गौडबंगाल उघड होईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!