google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

अखेर, कासवरील ‘त्या’ अनधिकृत बांधकामांना नोटीस…

सातारा (प्रतिनिधी) :

राष्ट्रमतच्या बातमी ची दखल घेत कास च्या बेकायदेशीर बांधकामांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार आशा होळकरांनी १२४अनाधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा काढल्या आहेत.

यात ३१ मालमत्ता न्याय प्रविष्ट असून कास परिसरातील मिळकत धारकांना 52/ 53 नोटीस देऊन सात दिवसात बांधकाम काढले नाही तर सातारा जिल्हा प्रशासन स्वतःहून अतिक्रमण काढणार व झालेला सर्व खर्च बोजा म्हणून सर्व मिळकतीवर चढवणार असल्याची माहिती तहसिल कार्यालयामार्फत देण्यात आली .


सातारा कास परिसरातील वाढत्या अवैध बांधकाम धारकांना अनेक वेळा नोटीस बजावण्यात आल्या, पण कारवाई काही होत नाही. यामुळे आशा होळकरांनी काढलेल्या नोटीसीत कारवाई होणार की दरवेळी प्रमाणे सेटलमेंट होणार अशी चर्चा पर्यावरणप्रेमी मध्ये होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!