![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/10/usa-new-york-state-new-york-city-crime-scene-barrier-tape-160018693-5ad2a55afa6bcc00368f0d73-780x470.jpg)
‘त्या’ मुलीचं अपहरण नव्हे, तर मुलीनेच केला बनाव ?
सातारा (महेश पवार) :
सोमवारी सायंकाळी कॉलेज युवतींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला? अशी बातमी प्रसिद्ध केली होती. दरम्यान या मुलीच्या वडिलांनी पोलीसांना माहिती दिली. व तक्रार केली यानंतर पोलिसांनी शहरातील कुठल्याही CCTV कॅमेर्यात असा प्रकार घडल्याचे दिसून आले नाही यामुळे पोलीसांनी संबंधित युवतीला चौकशीसाठी बोलावून घेतले.
यावेळी नक्की खरे काय हे विचारले असता, संबंधित युवतीने ती फिरायला गेली त्या दरम्यान उशीर झाला घरचे खवळतील म्हणून हा बनाव केल्याचं तिनं पोलीसांना सांगितले. परंतु या मुलीनं बनाव केल्यामुळे शहरातील CCTV कॅमेर्याचा मुद्दा ऐरणीवर आला आणि पोलीसांची पळापळ झाली .