google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

परळी आरोग्य केंद्र बनले असुविधाचे केंद्र…?

परळी (महेश पवार) :

यावर्षी  तीव्र उन्हाळा असून टेमप्रेचर वाढत चालल्याने अनेक जणांना डीहायड्रेशन चा त्रास देखील होतो मात्र यावर उपाय म्हणून अत्यावश्यक सलाईन लावाव्या लागतात मात्र या ठिकाणी सलाईन लावण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  त्यांना खाजगी वैद्यकीय सेवा घ्याव्या लागत आहेत या गोष्टीला कोण जबाबदार? असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात असून , परळी प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन वर्षांपूर्वीची ओपीडी आणि सध्या सुरू असलेल्या ओपीडी च्या रुग्ण संख्येमध्ये कित्येक पटीने संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळते.

यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालून यावर तातडीने उपाययोजना करावेत अशी मागणी होत आहे…

परळी आरोग्य केंद्रावर मेडिकल वेस्ट चा रोजच होतोय होम हवन 

आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्सला परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात केराची टोपली . डिलेव्हरी साठी आलेल्या महिलेची गाडीमध्येच प्रसुती , अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसल्याने पेशंटच्या जिवाशी खेळ . डॉक्टर मुक्कामी नसल्याने सातारा शिवाय पर्याय नाही. परळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराला चाप बसणार का ….?

परळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल वेस्ट गोळ्यांच्या पाकिटांचा दरवाज्यातच रोज जाळून होम हवन केलेल्या धुरातुन उपचार घेण्यासाठी येणाऱ्या पेशंटला यावं लागतं असल्याचे चित्र पहायला मिळते, यामुळे परळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्स फक्त कागदावरच असल्याचे चित्र पहायला मिळते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!