google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘मागील वर्षी लावलेल्या झाडांचे काय ?’

कराड (अभयकुमार देशमुख) :

कराड नगरपालिका हरीत कराड करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी माझी वसुंधरा अंतर्गत शहारात अनेक नवीन प्रोजेक्ट उभे करतेय. कराड नगरपालिका करत असलेला प्रयत्न एका दृष्टीने भाविष्यासाठी महत्वाचे म्हणावे लागतील.

मात्र मागील वर्षी केलेल्या वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करून नवीन झाडे लावण्याचा अट्टाहास का असा प्रश्न पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहेत.

मागील पावसाळ्यात शहरातील वाढीव भागात शंभरहून अधिक झाडाची लागवड केली. मात्र आता त्या झाडांचे नामोनिषानही दिसत नाही.

सर्वांनी हरीत कराड करण्यासाठी प्रयत्न करायला हवा मात्र यापूवी’ खर्च करून लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष का? प्रश्न उपस्थित होत आहे.

या झाडांची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या माणसांवर नगरपालिकेचा वचक राहिला नाही का ? असा प्रश्न या सर्व प्रकारानंतर उपस्थित होतोय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!