google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

पाचगणीच्या मुख्याधिकाऱ्यानी केला राष्ट्रध्वजाचा अवमान!

सातारा (महेश पवार) :


पाचगणी नगरपालिका यांचे अखत्यारीत येणाऱ्या शाळा क्रमांक १ श्री भाऊसाहेब भिलारे स्टेडियम येथे पाचगणी नगरपालिका यांनी प्रजासत्ताक दिना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेले होते.सदर कार्यक्रम नियोजनाचे ठिकाणी ठिकाणी स्टेज वर मान्यवर बैठक व्यवस्था ठिकाणी नगरपालिका प्रशासन गिरीष दापकेकर शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते, त्याठिकाणी पाठीमागे भारतीय राष्ट्र ध्वजाचा फोटो बॅनर वरती चुकीच्या पद्धतीने म्हणजेच केशरी रंग शेवटी व हिरवा रंग पहिल्या स्थानी असल्याचे तिरंग्यावर निदर्शनास आले.

सदर कार्यक्रम हा तीन तास सुरू होता कार्यक्रम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत जाणीवपुर्वक राष्ट्रध्वज उलट्या पद्धतीने दर्शवण्यात आला. मुख्याधिकारी यांना आपल्या देशाचा राष्ट्र ध्वज कसा असतो याची पूर्ण कल्पना आहे,असे असताना जाणीवपुर्वक भारतीय राष्ट्र ध्वजाचा अपमान आपले शासनाचे प्रतिनिधी यांच्याकडून झालेला आहे व आयोजक म्हणून ते स्वतः यासाठी जबाबदार असून , त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबाबत मुख्याधिकारी तथा प्रशासक पाचगणी गिरीष दापकेकर यांच्यावर THE PREVENTION OF INSULTS TO NATIONAL HONOUR ACT 1971 नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा ही विनंती अशी मागणी आकाश रांजणे यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!