google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

अभयकुमार देशमुख यांनी  बाबासाहेबांना वाहिली अनोखी अक्षरांजली…

कराड :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अनेकजन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. कराड तालुक्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते.

कराडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रात्री बारा वाजल्यापासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली.रात्री बारा वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कराड आणि आसपासच्या गावातील लोक उपस्थित राहत होते. तीच गर्दी सकाळीही दिसून आली.

कराडमध्ये लेखक,पत्रकार अभयकुमार देशमुख यांनी सुद्धा एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांनी स्वतः लिहिलेल्या मुखिया, एल्गार, वी हेट बायोलॉजिकल वॉर, मसनवाट, व्यक्त अव्यक्त भाग १ या कादंबऱ्यांचा हार बाबासाहेबांना अर्पण करत अनोखं अभिवादन केलं.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती कराडचे अध्यक्ष राहुल भोसले, माजी नगरसेवक आनंदराव लादे तसेच समितीचे इतर सदस्य आणि विठ्ठलराव देशमुख, विक्रमसिंह देशमुख आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!