मुख्यमंत्र्यांच्या गावात कोयनेच्या संपादित जमिनीवर अतिक्रमण नेमकं कोणाचं ?
सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे धरण म्हणून ओळखले जाणाऱ्या कोयना धरणाच्या संपादित जमिनीवर अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण केलेले दिसत आहे
यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावामध्ये कोयना धरणाच्या संपादित जमिनीवर देखिल मोठ्याप्रमाणात अतिक्रमण दिसत असून, सदर अतिक्रमण नेमकं कोणाचे असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान, यासंबंधी सिंचन विभागाने काही दिवसांपूर्वी ही अतिक्रमणे हटविण्यासंबधी परिसरातील अनेक गावांमध्ये नोटीसा देउन ही अतिक्रमणे सात दिवसांत काढण्याचे आदेश दिले. परंतु अचानक ही मोहीम थांबविल्याने चर्चा उधाण आलं असून कारवाई थांबवण्याचे नेमकं कारण काय ? असा सवाल जनमानसामध्ये उपस्थित होत आहे.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावामध्ये देखील कोयना धरणाच्या संपादित जमिनीवर झालेल्या अतिक्रमण नेमके कोणाचे आणि त्यावरती संबंधित कारवाई करणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.