शिवसागर जलाशयात पर्यटक बुडाला?
बामणोली (महेश पवार) ,:
शिवसागर जलाशयात म्हावशी ता. जावळी गावच्या हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास शिवसागर जलाशयात वॉटर स्कूटर पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला होता. संकेत संग्राम काळे वय २७ वर्ष रा. रेठरे वाठार ता. कराड या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की म्हावशी ता. जावळी हद्दीतील शिवसागर जलाशयात असलेल्या एका टेन्ट कॅम्पिंगवर काही पर्यटक पर्यटनासाठी आले होते. हा युवक नेमका कसा बुडाला याबाबत खोटी माहिती पसरवून अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात असून, त्याचा मृतदेह अद्याप बुधवारी दिवसभर शोध मोहीम महाबळेश्वर ट्रॅकर च्या माध्यमातून राबवण्यात आली असताना देखील बुडालेल्या युवकाचा मृतदेह ट्रेकर्सना सापडला नाही.
मेढा पोलीस प्रशासन घटनास्थळी असून बुधवारी सकाळपासून मृतदेहाचा शोध घेण्याचे महाबळेश्वर ट्रेकर्सच्या माध्यमातून हे काम सुरू होते.मात्र हा युवक नेमका कसा बुडाला याबाबत उलट सुलट चर्चांना बुधवारी दिवसभर उधाण आले असले तरी सदर घटनास्थळ परिसरात एक टेन्ट हाऊस असून या टेंट हाउस वर हे पर्यटक आले होते, टेन्ट हाऊसवर असलेल्या वॉटर स्कूटर बोट वरून पाण्यात सैर करताना स्कूटर बोट पलटी होऊन हा युवक पाण्यात बुडाला असे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचे आवाहन आता मेढा पोलीस प्रशासनासमोर आहे.
बुधवारी दिवसभर शोध कार्य सुरूच
दरम्यान शिवसागर जलाशयात बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम महाबळेश्वर ट्रेकर्सच्या माध्यमातून दिवसभर सुरू होते. त्याचबरोबर हा युवक नेमका कसा बुडाला याबाबत देखील शिवसागर जलाशयाचा काठावर नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती त्याचवेळी हा युवक नेमका कसा बुडाला याबाबत उलट सुलट चर्चा येथील उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती.
संबंधित हॉटेल व्यावसायिकाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?
संबंधित व्यावसायिकाकडून भीतीपोटी पर्यटक स्कूटर ऐवजी पोहताना बुडाला अशी खोटी माहिती पसरवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची जोरदार चर्चा असून..दरम्यान मद्यपान करून स्कूटर बोट चालवली कशी? हॉटेल मालकाला बोटिंगला परवानगी आहे का? पर्यटकांना स्कूटर चालवण्यासाठी का देण्यात आली? असे अनेक सवाल उपस्थित केले जात असून हा प्रकार दाबण्याचा संबंधित हॉटेल व्यावसायिकाकडून प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे..