google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षाच्या अडचणीत वाढ

महाबळेश्वर (महेश पवार) :
महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याअधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या महाबळेश्वर नगरपालीकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी . शिवसेना युवा सेना उप जिल्हाप्रमुख  सचिन वागदरे यांनी केलेल्या नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरुन . माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्यअधिकारी अमिता दगडे पाटील याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाअधिकारी सातारा यांना देण्यात आले होते . जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी जिल्हाअधिकारी सातारा याच्यातर्फे नगरविकास खात्याला पाठवलेल्या अहवाल पाठवण्यात आला असुन .महाबळेश्नर निवडणुकीच्या अगोदरच तत्कालीन मुख्याअधिकारी अमिता दगडे पाटील व माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे याच्यावर टांगती तलवार उभी राहील्याने महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे .

महाबळेश्वर नगरपालीकेच्या भ्रष्ट्राचाराबात सातारा जिल्हा युवासेना उप जिल्हाप्रमुख  सचिन वागदरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये  .महाबळेश्वर नगरपालीकेच्या नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याअधिकारी अमिता दगडे पाटील यांनी स्वच्छता अभियानामधील करोडो रुपयाच्या टेडर मध्ये कोणतीही कायदेशीर पद्धतीचा अंवलंब न करता तांत्रिक मंजुरी न घेता आपल्या जवळच्या कार्यकर्यत्याना टेडर दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे  . स्वच्छता अभियानात नियमबाह्य कामे करुन मनमानी अवास्तव  रकमालावुन टेडर काढतां कचरा डेपो , रंगरंगोटी घंटागाडी खरेदी, डस्टबीन खरेदी ,

बाजारा मुल्यापेक्षा ,लेन्स कॅमेरी खरेदी ,स्वच्छता अभियानात अडव्हरटायजिंग करीता दिलेले टेडर घोटाळा .यतिराज बाधकाम कपनीच्या बाधकाम ठेक्याबाबत .स्वच्छता जनजागृती करीता वापलेल्या सामग्रमध्ये नियमबाह्यता , सोशल मिडीया जनजागृतीमध्ये अवास्तव व भरमसाठ बीलाची केलेली वाढ . बोगस कर्मचारी दाखवुनबील काढुन कोटी रुपायचा चुना नगरपालीका लावला असल्याची तक्रार युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे यांनी केली होती .

दरम्यान जिल्हाप्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव यांना पाठवलेल्या अहवालात चैाकशी अधिकार्याच्या चौाकशी अहवालात फार गंभीर बाबी नमुद केल्या आहेत . महाबळेश्वर नगरपालीकेने खरेदी केलेल्या मशनरी व साहीत्य खरेदी नियमभाह्य व आर्थीक देयके देताना नियमभाह्याता अहवालतात चैाकशी अधिकारी यांनी ठपका ठेवला आहे . मलनिस्सारण केद्राच्या देखभाल दुरुस्तीचा निवीदेमध्ये घोळ ,नगरपालीकेचे नुकसान करुन प्रदुषण कर व प्रवासी कराचा नियमभाह्य ठेका , यतिराज कन्सट्रखसन्सला रंगरगवटी साठी दिलेला ठेका व यतिराज कन्सट्रकशन्स कपनीला काढलेली नियमभाह्य बीले , अशा विविध मुद्द्यानवर चैाकशी अहवालात भ्रष्ट्राचार केला असल्याचा ठपका चैाकशी अधिकारी यांनी चैाकशी अहवालात ठेवण्यात आला आहे .

दरम्यान राज्याचे माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन राज्याचा कारभार सांभाळत आहेत . माजी नगराध्याक्षा व तत्कालीन मुख्याअधिकारी यांच्यवरील भ्रष्ट्राचाराची पोलखोल नगरविकास खात्याकडे दाखल अहवालात चैाकशी अधिकार्याकडुन स्पष्ट झाले आहे . याबाबत शिंदे सरकार काय भुमीका महाबळेश्वर नगरपालीकेच्या निवडणुकीच्या पाश्वभुमीकेवर घेणार याबाबत आता उत्सुकता वाढली आहे .तर माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पदाचा गैरवापर करुन आर्थिक अनियमतता व भ्रष्ट्राचार केला असल्याचे चैाकशी अहवालात चैाकशी अधिकार्याना स्पष्ट केल्याने . महाबळेश्वरच्या राजकारणात माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे हे मात्र नक्की.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!