अट्टल गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळल्या
सातारा (अभयकुमार देशमुख) :
पुण्यातील अट्टल गुंड गजानन मारणेच्या मुसक्या पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या आहेत.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणात ही कारवाई करण्यात आलीय. साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे पाटील यांच्या फार्महाऊस वर भेटण्यासाठी आले असताना पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीय.
गजानन मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि कर्मचार्यांनी ताब्यात घेतले आहे.