अतिक्रमणाची ‘गर्दी’; हतबल आहे वर्दी?
सातारा (महेश पवार) :
शहरातून कास बामणोली व परळी खोऱ्यात जाणाऱ्या वाहन धारकांना समर्थ मंदिरच्या चौकातील त्या रस्त्यावरील दुकानामुळे व हातगाड्या मुळं याठिकाणी ट्राफिक जाम होते , या दुकानांमध्ये अवैध रित्या विक्री होत असलेल्या गुटख्याच्या खरेदी साठी चालत्या गाड्या रस्त्यावर थांबल्यामुळे या ठिकाणी नेहमीच ट्राफिक जाम होते.
यामुळे याठिकाणी दिवसा ढवळ्या अवैध गुटखा जन्य पदार्थ विक्री नेमकी कोणाच्या आशिर्वादाने? सुरू आहे असा सवाल उपस्थित होत आहे . पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन नेमकं का आहे हतबल . तर नगरपालिका प्रशासनाने खर तर याठिकाणी असलेली अवैध दूकानाची अतिक्रमण हटविण्याची गरज आहे कारण याच रस्त्यावरून लाखो पर्यटक ये-जा करत असताना याठिकाणी होणा-या या ट्राफिक जाम चा त्यांना त्रास सहन करावा लागतो यामुळे अतिक्रमणाच्या ‘गर्दीला ‘ हतबल आहे का वर्दी?असं म्हणायलाही काही हरकत नाही.