google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

ठोसेघरात कथित ठेकेदार गावपुढाऱ्याची दांडगाई…

सातारा (महेश पवार) :

ठोसेघर, ता. सातारा येथे पाणी योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या साईडपट्टीवर विनापरवाना सुमारे 3 कि.मी. अंतरावर चर काढून शासनाचे कोट्यवधीचे नुकसान केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. वन विभागाच्या जमिनीतून खोदकाम केलं आहे. तसेच रामचंद्र कोकरे नावाच्या धनगर समाजातील गरीब शेतकऱ्याच्या जमिनीतून पाईपलाईन नेण्यात येणार असल्याचे समजते. तथाकथित ठेकेदार बनलेल्या गावपुढाऱ्याची ठोसेघरात दहशत असून उघडपणे बोलण्याचे धाडस ग्रामस्थ करीत नाहीत. काहींनी याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाचं नेमकं चाललयं काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या आधी २० वर्षांपुर्वी झऱ्याचे पाणी पाईपलाईनद्वारे धनगर वस्तीला आणले होते. मात्र धनगर समाजाला पिण्यासाठीचे पाणी स्वतःच्या हॉटेलसाठी पळवून नेवून धनगर समाजातील पाच ते सहा कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा काळा धंदा ठोसेघरात तथाकथित ठेकेदार बनलेल्या गावपुढार्‍याने केला असल्याची तक्रार रामचंद्र कोकरे यांनी केली आहे. कागदोपत्री इतराचं नाव मात्र स्वतःच तथाकथित ठेकेदार बनलेल्या गावपुढार्‍याने याआधी अनेक काळे कारनामे केले असल्याचे समोर येत आहे. त्याच्या या बेकायदेशीर कृत्यांबाबत वारंवार तकारी करून सुद्धा प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे आता काहीही झाले तरी पाणी योजनेची पाईप लाईन आमच्या जमिनीतून नेवून देणार नाही, असा इशारा कोकरे यांनी दिला आहे.

दरम्यान, वन विभागाच्या हद्दीतून पाईप लाईनसाठीचे विनापरवाना खोदकाम सुरु असताना वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकामचे अधिकारी मूग गिळून गप्प बसलेत. याचा अर्थ आर्थिक देवाण झाली असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सातारा तालुक्यातील ठोसेघर गावचे रामचंद्र कोकरे यांचे सर्वे नंबर 191 मध्ये घर व शेती असून इथल्या स्थानिक गाव पुढाऱ्यांनी वेळोवेळी त्यांच्यावर अन्याय केला असल्याचं मत कोकरे यांनी व्यक्त केले आहे. सातारा ठोसेघर हा रस्ता कोकरे यांच्या बागायत क्षेत्रातून दिला गेला असून त्याचा कोणताही मोबदला कोकरे यांनी घेतला नाही अथवा शासनाने दिला नाही. यामुळे आमच्या शेतातून जाणारी गावाची पाण्याची लाईन आम्ही जाऊ देणार नाही. कारण याच गाव पुढाऱ्यांनी आमचं पिण्याचे पाणी स्वतः च्या हॉटेलसाठी नेऊन आम्हाला गेली दहा ते पंधरा वर्षे पाण्यापासून वंचित ठेवले आहे. आम्ही काही बोललो तर त्यांना ते चालत नाही. यामुळे आम्ही बोलत नाही. त्यामुळे त्यांनी देखील आमच्या जमिनीतून पाईपलाईन न्यायची नाही, असा सज्जड दम रामचंद्र कोकरे यांनी राष्ट्रमत शी बोलताना दिला आहे .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!