![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/10/usa-new-york-state-new-york-city-crime-scene-barrier-tape-160018693-5ad2a55afa6bcc00368f0d73-780x470.jpg)
साताऱ्यात कॉलेज युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न…?
सातारा :
पोवई नाका ते वाय सी कॉलेज रोडवर एका लॅब समोर अज्ञात वाहनातून आलेल्या बुरखाधारी व्यक्तीकडून युवतीला वाहनात खेचण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित युवतीने हात झटकून पळ काढला , आणि घर गाठले यानंतर युवतीच्या घरच्या लोकांनी थेट पोलिस स्टेशन गाठले . मात्र पोलीसांना त्या दरम्यान फुटेज सापडले नाही . यामुळे गेली अनेक वर्षांपासून मागणी करून देखील शहरातील मुख्य ठिकाणी CCTV नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील कॉलेज परिसरात CCTV नसल्याचं माहिती समोर आली , एकीकडे प्रशासन कास ची फुले वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करते मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी अनेकदा मागणी करूनही ते बसवले जात नाहीत. यामुळे या घटनेनंतर तरी जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडणार का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.