‘भारत जोडो यात्रे’चे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निमंत्रण
सातारा (महेश पवार) :
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात भव्य स्वागत करण्यात येणार आहे त्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने सगळ्या पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना यामध्ये सहभागी करून घेण्याचा नवीन पायंडा ही यानिमित्तानं पडल्याचे समोर आले आहे. भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक आणि हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजित देशमुख यांनी आज अधिकृतरीत्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निमंत्रण दिलं.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करताना त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते सहभागी करण्याची व राहुल गांधींचा संदेश जिल्ह्यातील तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयकावर सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागात आणि विशेषता शेतकरी वर्गामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव आहे राजू शेट्टींचं आंदोलन असेल किंवा दुधाचा आंदोलन असेल किंवा इतर समस्यांवर आक्रमकपणे भूमिका मांडण्याची स्वभाव असेल या सगळ्यांवर ग्रामीण भागामध्ये राजू शेट्टी थेट शेतकऱ्यांच्या मध्ये लोकप्रिय आहेत याचा फायदा उचलण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा समन्वयक रणजितसिंह देशमुख यांनी अधिकृत रित्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या भारत जोडो अभियान याचे निमंत्रण दिले आहे.
महाराष्ट्र मध्ये तेरा दिवस ही यात्रा ठिक ठिकाणी फिरणार आहे या यात्रेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि त्यांच्या सर्व समूहातल्या परिवारातल्या या संघटनेच्या सदस्यांनी सहभागी व्हावं आणि राहुल गांधींचा विचार तळागाळात पोहोचवा असे आवाहनही यावेळी रणजितसिंह देशमुख यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आणि खटाव चे तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे यांना रणजितसिंह देशमुख यांनी ते निमंत्रण देत भारत जोडो अभियानाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचेही आवाहन केले. यावेळी रणजितसिंह देशमुख यांनी अधिकृत राजू शेट्टी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत भारत जोडो यात्रेबाबत आणि महाराष्ट्रातील यात्रेबाबत प्राथमिक माहिती दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेल्या जुने आणि नवीन आल्याच्या यशस्वी आंदोलनाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.यावेळी राष्ट्रीय काॅग्रेस चे तालुका अध्यक्ष मा. संतोष गोडसे,विधानसभा अध्यक्ष डाॅ.महेश गुरव, विजय शिंदे,टिल्लु बागवान,राहुल सजगने उपस्थित होते.