google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘प्री-वेडिंग’च्या नावाखाली उरमोडीत ‘काय’ घडतेय?

सातारा (महेश पवार) :

तालुक्यातील परळी खोर्यातील उरमोडी धरण क्षेत्र परिसर हा हिरवाई ने नटलेला परिसर असून पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उरमोडी धरण क्षेत्रात बेकायदेशीर प्री-वेडिंग स्पॉट तयार केला गेला असून उरमोडी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या प्री-वेडिंग स्पॉट वर अश्लील प्रकार घडत असल्याचे चित्र पहायला मिळते.

यामुळे प्री-वेडिंग नंतर अनेक मुलींचा संसार उभा राहण्यापुर्वी मोडल्याच्या घटना ऐकिवात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर उरमोडी धरणात बोटींग ला परवानगी नसताना देखील याठिकाणी धरण क्षेत्रात बेकायदेशीर बोटींग केली जाते . एवढ्यावरच न थांबता संबंधित मात्र प्री-वेडिंग साठी आलेल्या कपलला बोटीच्या टोकांवर उभं करून जीव धोक्यात घालून फोटो शुट करताना दिसताहेत मात्र हे सर्व सुरू असताना देखील पाटबंधारे विभागाचे अधिकारी कारवाई करत नसल्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी नेमके कुठे गेलेत ?असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात आहे.

उरमोडी धरणाच्या परिसरात बेकायदेशीरपणे बोटींग तसेच धरण क्षेत्रात ड्रोनच्या माध्यमातून विनापरवाना व्हिडिओ शूटिंग केले जात असताना याठिकाणी पोलिस मात्र नेमकं काय करतायत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याठिकाणी काही दिवसांपूर्वी दोन युवकांचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला असताना देखील पोलिस याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याने उरमोडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!