विक्रमसिंह देशमुख मित्रपरिवाराने जोपासली सामाजिक बांधीलकी
सातारा (प्रतिनिधी) :
विठठलराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमसिंह देशमुख मित्र परिवाराकडून प्रभाग क्रमांक ३ मधील अंगणवाडी क्र ११७ तील विद्यार्थाना गणवेश वाटप करण्यात आले. एकूण ३० विद्यार्थाना कराड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी विलास चव्हण , मंगेश वास्के , व्हाईस ऑफ मिडीयाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार लेखक अभयकुमार देशमुख, पत्रकार अमोल टकले , पत्रकार सुहास कांबळे , गणेश सातारकर ,धनंजय कुंभार ,प्रशांत भोसले
प्रथमेश भोसले ,वंदना देशमुख सारीका देशमुख
अंगनवाडी सेविका – सुरेखा जाधव ,वैशाली देसाई
वंदना पाटसुपे मिना काटवटे आणि विद्यार्थांचे पालक उपस्थित होते.
यावेळी सौरभ पाटील यांनी देशमुख परिवाराने राबवलेल्या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तर विलास चव्हाण यांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत जमत राबवलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.