google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

दुचाकी चोरी प्रकरणी अट्टल चोरटयास अटक

सातारा (महेश पवार) :

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या अभिजीत राजाराम लोहार (वय 35 मूळ रा. आंबवडे बुद्रुक ता. जि. सातारा, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) यास सातारा शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.


याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे, सहा.पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या
मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी. बी. पथक हे दुचाकी चोरीमधील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना बातमीदारामार्फत एका सराईत दुचाकी चोरटयाची माहिती मिळाली. अभिजीत राजाराम लोहार यास डी.बी. पथकाने ताब्यात घेवून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता दि.०९ रोजी सातारा एस. टी. स्टँन्ड परिसरातून एक हिरो होन्डा पॅशन दुचाकी चोरी केली असल्याची कबुली त्याने दिली. तसेच त्याने अन्य ठिकाणाहून आणखी दोन दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यादेखील पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेली असून त्याबाबत अधिक माहिती घेत आहेत.

या चोरटयावर यापूर्वी देखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे अधिक तपास करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे, सहा. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, मपोनि वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील
पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, पो.ना. विक्रम माने, पो.कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, सागर गायकवाड यांनी केलेली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!