सातारा
कास पठार परिसरात वृक्षतोडीला अभय नेमकं कोणाचं?
सातारा (महेश पवार) :
जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावरील अटाळी परिसरात वृक्षतोड करून जमीन लेवल करण्याचे काम सुरू असून हे असंच सुरू राहिलं तर कास पठार परिसरात जंगल पाहिला तर मिळणारच नाही तर कास पठाराची जैवविविधता धोक्यात येऊन जागतिक दर्जा देखील जाण्याची शक्यता दाट शक्यता असून देखील जिल्हा प्रशासन ,वनविभाग आणि महसूल विभाग मुग गिळून गप्प का?असा सवाल जनमानसामध्ये उपस्थित होत आहे.
कास पठारावर सुरू असलेल्या लेव्हलिंग , वृक्षतोड, प्लॉटिंग तसेच बेकायदेशीर बांधकामे यांवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची ठोस अशी कायदेशीर कारवाई केली जात नसल्याने , जिल्हा प्रशासनाच्या अभयामुळेच हे सर्व सुरू आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे . आजवर फक्त नोटीसा काढण्यात आल्या पण पुढची कारवाई शुन्य असल्याने या परिसरात लेव्हलिंग , वृक्षतोड, प्लॉटिंग तसेच बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेत . यामुळे भविष्यात कास पठाराचे काय होणार?