सातारा
नशिबाच्या चिट्ठीने दिली सत्ताधाऱ्यांना साथ
कराड (अभयकुमार देशमुख) :
कराड तालुक्यातील केसे येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची झाली अटीतटीच्या या लढतीत सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवारांना एका एका मताने विजय पराभव पहायला मिळाला चार तास चाललेली अन दोन वेळा फेर मतमोजणी घेण्यात आलेली ही निवडणूक चिठ्ठीच्या साथीने सत्ताधारी गटाला जिंकण्यात यश आलं.
भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीमुळे केसे वारुंजी पंचक्रोशीतील राजकारण चांगलेच तापले होते स्वर्गीय विलासराव पाटील काका आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधी गटाला आठ जागा मिळवता आल्या तर सत्ताधारी गटाला आठ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळाले तर एका जागेवर चिठ्ठीने साथ दिल्याने विजय मिळाला त्यामुळे या निवडणुकीत संमिश्र सत्ताधारी पॅनेलने नऊ जागा जिंकत सत्ता अबाधित राखली दरम्यान काठावर पास झालेल्या या लढतीत विजयानंतर कोणताही जल्लोष करण्यात आला नाही.