राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर यांच्याबद्दल जे उदगार काढले आहेत. त्याचा गुरुवारी बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. पोवई नाका येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधींनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. काँग्रेसचे नेते इंग्रजांशी लढत असताना सावरकरजी इंग्रजांची हात जोडून प्रार्थना करत होते असं ते म्हणाले असल्याने सर्वत्र त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. साताऱ्यात बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी पोवई नाका येथे प्रतिमेस जोडे मारण्यात आले.
यावेळी शिंदेसाहेब तुम आज बढो हम तुमहारे साथ है, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, बाळासाहेबांच्या शिवसेनचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, युवासेना प्रमुख रणजित भोसले, महिला प्रमुख शारदा जाधव, तुकाराम ओंबळे यांची उपस्थिती होती.