सज्जन गडावरील रामघळीजवळ सापडले बिबट्याचे बछडे
सातारा :
शहरापासून जवळच असलेल्या सज्जनगडावरील रामघळ परिसरात मंगळवारी काही युवक भटकंती करत असताना वाटेत बिबट्याचं बछडे दिसल्यावर युवक घाबरले, यावेळी त्या युवकांनी आजूबाजूला कुठे त्यांची आई कुठे दिसते का पाहिले,या घटनेची माहिती संपुर्ण गडावर वार्यासारखी पसरली यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
ही घटना जवळपास तीन वाजता घडली असून घटनेनंतर दोन तास उलटून गेले तरी वन कर्मचारी पोहचले नाही. यानंतर सातारा तालुका वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण हे सज्जनगडावर पोहचले व त्यानी त्या बछड्याला कोणतीही हनी पोहचू नये त्याला त्याच्या आई पर्यंत कसं सोडता येईल त्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.