महावितरण घोटाळा : सोमनाथ गोडसेला ६ जुलै पर्यंत कोठडी
सातारा (महेश पवार) :
कंपनीच्या शेकडो कंत्राटी कामगारांच्या पगारातून कपात करून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा केलेप्रकरणी सोमनाथ गोडसे विरोधात सातारा पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी पोलीसांना शरण आला यानंतर सातारा पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमनाथ गोडसे याला सहा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घोटाळ्या संदर्भात पोलीसांना अनेक धागेदोरे हाती लागले असल्याने या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तसेच या घोटाळ्यांची व्याप्ती मोठी असल्याने न्यायालयाने सहा जुलै पर्यंत गोडसेला पोलीस कोठडी सुनावली आहे.
महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या पगारातून दरमहा कपात करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्या गोडसे याला सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर सहा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली हा महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांचा विजय असुन या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या अधिकार्यावर देखील कारवाई होण गरजेच असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले.
तसेच गोडसे वर कारवाई झाल्यानं कायदा आजही सर्वसामान्य माणसाच्या बाजूनं असल्याचे दिसते , तसेच सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ व सहायक पोलिस निरीक्षक गुरव यांनी आज खर्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे तपास करत ही कारवाई केली असल्याचे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी सांगितले.