google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

दहावीतील यशाबद्दल समिक्षाचे होतेय कौतुक 

भुईंज (महेश पवार) :
बावधन ता वाई येथील डॉ जनार्दन भोसले यांची कन्या समिक्षा जनार्दन भोसले हिने दहावीत दिल्ली बोर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळविल्याबद्दल  खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर व भाजपा ओबीसी मोर्चाचे पुण्याचे अध्यक्ष तथा न-हे गावचे उपसरपंच सागर भूमकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
जन्मभूमी सोशल फौंडेशन मार्फत इयत्ता १० आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुनील वाल्हेकर जि प सदस्या जयश्री भूमकर, सत्यवान भूमकर, माजी उपसरपंच अक्षय इंगळे, अनिता कुटे, राकेश पवार , बजरंग खेडेकर ,संभाजी काकडे,आकाश कुटे, निलेश मेमाने,निलेश गायकवाड,श्रीकांत खेडेकर, संतोष आंबेकर ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी ,ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते. जेष्ठ साहित्यिक वि.ग.सातपुते यांचे विशेष आशीर्वाद लाभले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!