पालकमंत्री शंभूराज देसाईना जिल्हा प्रशासन जुमानत नाही?
सहा महिन्यांत साठ वेळा मागूनसुध्दा कासच्या कारवाईचा अहवाल मिळेना...
सातारा (महेश पवार) :
वर्ल्ड हेरिटेज असणाऱ्या कास पठार परिसरात होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे कास पठार गेल्या काही दिवसापासून चर्चेचा विषय बनले आहे , यामुळे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कास पठार परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकाम आणि वृक्षतोडी संदर्भात साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांना कास पठार परिसरातील झालेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत सहा महिन्यापूर्वी अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश दिले. परंतु सहा महिन्यांत साठ वेळा जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी कास पठारावरील बेकायदेशीर बांधकामांच्या कारवाई चा अनेक वेळा अहवाल मागून देखील मिळाला नाही . यामुळे पालकमंत्र्यांना देखील जिल्हा प्रशासन जुमानत नाही अशी म्हणण्याची वेळ आली.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी ज्या ज्या वेळी पत्रकार परिषद घेतली त्या त्या वेळी देसाई यांनी जिल्हाधिकारी यांना लवकरात लवकर अहवाल द्या पत्रकार सारखेच प्रश्न विचारात आहेत असं म्हणून देखील जिल्हा प्रशासनाकडून अहवाल तयार करत असल्याची माहिती पालकमंत्र्यांना दिले जाते परंतु गेली सहा महिने उलटून गेले तरी अहवाल तयार होत नसल्याने जिल्हा प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.