![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/01/pngtree-mobile-phone-for-video-call-mockup-app-png-image_2649210-640x470.jpg)
‘कलेक्शनचा डेटा आला का?’; कोणी केली ही विचारणा?
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते , दरम्यान या प्रेस कॉन्फरन्स चे टाइमिंग बदलल्याने पत्रकार त्या ठिकाणीच बसून राहिले दरम्यान ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येणार होती , त्या ठिकाणीच पालकमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते.
दरम्यान पालकमंत्री येण्या अगोदर त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे टेस्टिंग सुरू असताना , मंत्रालयातील अधिकाऱ्यांची सुरू असलेली चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हॉलमध्ये पत्रकार परिषदेसाठी बसलेल्या पत्रकारांना ऐकू येत होते.
दरम्यान संबंधित अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना कलेक्शन चा डेटा आला का? विचारत होता यामुळे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या मध्ये कलेक्शन नेमकं कसलं आणि कोणाचं यांची जोरदार खमंग चर्चा रंगली होती.