google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘अजिंक्यतारा’ची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध


सातारा (महेश पवार):

महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील नावाजलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या सर्व मतदारसंघात निवडून द्यायच्या प्रतिनिधी संख्येइतकेच उमेदवार त्या- त्या मतदारसंघात शिल्लक राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला आहे.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्या.शाहुनगर-शेंद्रे,ता.जि.सातारा या कारखान्याची सन-२०२२-२०२३ ते २०२७-२०२८ या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ च्या नियम ३२ मधील तरतुदीनुसार सत्ताधारी पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ऊस उत्पादक सभासद गट क्र. -१ सातारामधून भोसले शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे, सावंत नामदेव विष्णू, घोरपडे राजेंद्र भिकू हे बिनविरोध निवडून आले. व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -२ नागठाणेमधून साळुंखे मोहनराव नथुराम, निकम एकनाथ उर्फ सुनिल दत्तात्रय, साळुंखे यशवंत हरी यांची बिनविरोध निवड झाली.

व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -३ अतितमधून काळभोर शिवाजी रघुनाथ, जगदाळे रामचंद्र रंगराव, जाधव बजरंग श्रीरंग, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक-४ चिंचणेररमधून शेडगे विश्वास रामचंद्र, घोरपडे भास्कर एकनाथ, घोरपडे विजयकुमार आनंदराव, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -५ गोवेमधून सावंत सर्जेराव दिनकरराव, साबळे पांडुरंग आप्पाजी, पाटील नितीन भानुदास हे बिनविरोध झाले.

सातारा उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून साळुंखे शशिकांत यशवंत, महिला राखीव मतदार संघातून फडतरे विजया सत्पाल आणि शेलार वनिता अशोक, इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून कुंभार जयवंत रामचंद्र, वि.जा.भ.ज./विमाप्र राखीव मतदार संघातून कुराडे अशोक रामचंद्र, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातून पवार वसंत जगन्नाथ हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!