उप अभियंताच्या टक्केवारीला कंटाळून लाईनमन झाला आत्महत्येला प्रवृत्त?
सातारा (महेश पवार) :
सातारा येथील महावितरण कार्यालयातील लाईनमन सचिन तावरे नावांच्या कर्मचाऱ्यांवर आपल्या मर्जी प्रमाणे काम करण्यासाठी महावितरण चे अधिक्षक उप अभियंता बारटक्के दबाव टाकत असून , विज बिल कलेक्शन चे कमीशन न दिल्याने महावितरण च्या ठेकेदाराला हताशी धरुन बारटक्के यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या या त्रासाला कंटाळून सचिन तावरे यांनी आपल्या कार्यालय प्रमुखांना मी आत्महत्या करायला जात असल्याचा मेसेज करून निघून गेल्याची घटना घडली.
तावरे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने सातारा तालुका पोलीस स्टेशन मध्ये केली आहे.
नेमकं काय लिहिलं तावरे यांनी आपल्या मेसेज मध्ये ते पाहूयात….
श्री पांढरपट्टे साहेब मी आत्महत्या करायला जात आहे .
मी श्री अमित बारटक्के साहेब यांच्या सांगण्यावरून ag चे bill भरणे साठी नाशिकवाल्याचे वॉलेट वापरायला सांगितले ते मला 3% कमीशन देत होते . त्यातील मी वायरमन ना 2% देत होतो . बँकेत कॅश diposit charge लागत होते , ते मी श्री बारटक्के सांगितले तसेच इतर वॉल्लेट वाले वायरमन ला 3% कमीशन देत होते . त्यामुळे माझ्याकडे कोणीही बिल भरत नव्हते त्यामुळे मी दुसऱ्याचे वॉलेट घेतले व मी वायरमन ला 3% कमीशन देऊ शकलो . यानंतर श्री अमित बारटक्के साहेबांनी बोलवून घेतले व तू नाशिक वल्याचे वॉलेट वरून बिल मारत जा नाहीतर मी तुला अडचणीत अनेन असे म्हणाले . श्री अमित बारटक्के यांना नाशिक वाल्याकडून कमीशन मिळत होते तरी माझ्या कडून पैश्याची मागणी करत होते . श्री दिलीप शामराव कणसे यांचे काम हे त्यांनी बंटी धोंडवड यांना दिले होते , तरी मला ते काम करणे साठी माझ्यावर दबाव टाकत होते . मी त्यांना सांगितले होते की तुम्ही काम मंजूर करून घ्या त्या ग्राहकाने सर्व कागदपत्रे मंजुरीला दिले होते . श्री अजिंक्य गोडसे वळसे व श्री आनंदा बर्गे चिंचनेर श्री संतोष खताळ यांनी मला धमक्या देत होते .
त्या अजिंक्य गोडसे ह्याने तर मला घरी येवून तमाशा करणार आहे . तुला जिवे मारणार आहे . तुला दाखवतो असे म्हणाला होता . हे सर्व पांढरपट्टे साहेबांना माहीत आहे .
वर्णेतील चोरी पकडून दिली , त्या ग्राहकाने माझे नाव घेतले व श्री धस्के यांनी मला फोन करून मला त्रास दिला , तरी ते अजून आकडा टाकून वापर चालू आहे
माझ्या आत्महत्येस श्री अमित बारटक्के व श्री अजिंक्य गोडसे व संतोष खताळ आणि आनंदा बर्गे जबाबदार आहे
असल्याचा मेसेज त्यांनी आपल्या कार्यालय प्रमुखांना व घरच्यांना केला आहे.
या सर्व प्रकारानंतर सचिन तावरे यांच्या कुटुंबीयांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, लाईनमन सचिन तावरे यांच्या पत्नीने पत्रकारांशी बोलताना सांगितले की महावितरण चे अधिक्षक उप अभियंता अमित बारटक्के व अजिंक्य गोडसे यांच्या त्रासाला कंटाळून निघून गेले आहेत त्यांना शोधून द्या अशी मागणी सचिन तावरे यांच्या पत्नीने केली आहे.
महावितरण कार्यालयातील अधीक्षक उप अभियंता बारटक्के यांच्या टक्केवारीचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून महावितरण कार्यालयात सध्या बारटक्केच्या टक्केवारीची जोरदार चर्चा सुरू आहे .