‘साहेब, पाणी नदीत सोडण्यापेक्षा कॅनल मध्ये सोडा’
सातारा (महेश पवार):
सातारा जिल्हा हा भौगोलिक परिस्थिती पाहता पुर्वेकडील भागात दुष्काळ आणि पश्चिम भागात जोरदार पाऊस पहायला मिळतो , मात्र यावर्षी पावसाने पावसाळी प्रदेशात देखील म्हणावा तेवढा पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे, उत्तर कोरेगाव परिसरात काही प्रमाणात पाऊस पडतो मात्र यावर्षी त्या पावसाने दडी मारल्यामुळे या परिसरातील शेती धोक्यात आली आहे.
लिंब,गोवे,मालगाव,शिवथर,वडूथ ,आरफळ,खंडोबाची वाडी यासह अनेक गाव आजही पाऊसाच्या प्रतिक्षेत आहेत, यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, यामुळे अत्ता पडणार्या पाऊसाचे योग्य नियोजन करून भविष्यात होणारी टंचाई रोखता येऊ शकते , यासाठी जिल्हा प्रशासनाने धोम धरणातून सोडण्यात येणारे पाणी नदीपात्रात न सोडता ते पाणी धोम कॅनल च्या माध्यमातून सोडून ओढ्याच्या माध्यमातून छोटे बंधारे , विहरी पुनर्भरण केला गेला तर या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच गावातील लोकांना पाण्याची टंचाई भासणार नाही यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वेळीच लक्ष घालून नदी वाटे वाया जाणारे पाणी कॅनल च्या माध्यमातून सोडावं अशी मागणी या परिसरातील शेतकरी करु लागले आहेत.
आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या या गावांना पाणी मिळण्यासाठी आपली तत्परता दाखवून या भागातील लोकांच्या मागणी नुसार धोम धरणातून सोडण्यात येणारे पाणी धोम कॅनल च्या माध्यमातून सोडण्यासाठी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.