कराडात स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग…
कराड (महेश पवार) :
पुणे-बेंगलोर महामार्गावर जुने टायर स्क्रॅप गोडावूनला रात्री उशिरा 11 वाजता भीषण आग लागली. कराड जवळ गोटे गावच्या हद्दीत आग लागली असून अग्निशमक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तब्बल दीड ते दोन तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.
कराडजवळ गोटे गावच्या हद्दीत हॉटेल फर्न पासून काही अंतरावर अचानक आग लागली. या आगीचे मोठ मोठाले लोट पसरल्याने महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावरील काही लोकांनी अग्निशामक दलाच्या गाड्यांना फोन केल्यानंतर कृष्णा हॉस्पिटल व कराड नगरपालिकेच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग विजवण्यात आली मात्र या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, या आगीच्या घटनेमुळे गोटे व मुंढे गावचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता