मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताह
सातारा (महेश पवार) :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे वाढदिवसांच्या औचित्य साधुन अशोका कन्स्ट्रक्शनं सातारा मेडिकल आसो.वतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात आरोग्य सप्ताहाच्या कार्यक्रमाचे नियाेजन करण्यात आले असून . आज वाई येथील यशोधन संस्थेमध्ये आरोग्य सप्ताहाच्या कार्यक्रमांची सुरुवात पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते मेडिकल किट व जिवनावश्यक वस्तुचे वितरण करून करण्यात आली.
सातारा जिल्ह्यांत यशाेधन संस्थेचे खुप चांगल्या पध्दतीने काम सुरू असून देखील शासकीय नियमावली मुळे शासकिय याेजनाचा संस्थेला लाभ मिळाला नाही पंरतु या पुढे शासकीय याेजना संस्थेपर्यत्न पाेहचवचयाचा प्रयत्न नक्की करु अशी ग्वाही देसाई यांनी दिली , यावेळी यशाेधन च्या माध्यमातुन अनाथासाठी चालत असलेल्या कामाची माहिती रवि बाेडके व साेनल बाेडके यांचे कडुन पालकमंत्री देसाई यांनी घेतली.
या कार्यक्रमाला मुंख्यमत्री यांचे वडिल संभाजी शिंदे, मुंख्यमंत्री यांचे बंधु ठाणे चे नगर सेवक प्रकाश संभाजी शिंदे महाबळेश्वर चे उपसभापती संजयबाबा माेरे,मेडिकल असाे.सातारा अध्यक्ष प्रविन पाटील, पत्रकार सुजित अंबेकर जि.प.चे सदस्य शशिकांत पवार.बा.शिवसेना चे सातारा जिल्हा अद्यक्ष निलेश माेरे ,वाई चे ता.अध्यक्ष दिनेश खैरे ,हिदुस्थान प्रतिष्ठान चे जायगुडे ,मेडिकल असाे.पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित हाेते.