
आईचं दूध पिताना ठसका लागून चिमुकलीचा मृत्यू
सातारा (महेश पवार) :
आई अंगावरील दूध पाजत असताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला ही हृदय द्रावक घटना कराड तालुक्यातील कवठे येथे घडली . गेल्या दोन दिवसात लहान बालकांच्या अकाली मृत्यूच्या सलग दोन घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे .
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की स्वाती कृष्णात यादव राहणार कवठे तालुका कराड यांनी अडीच महिन्यापूर्वी मुलीला जन्म दिला .रात्री नेहमीप्रमाणे मुलीला त्या अंगावरील दूध पाजत होत्या त्यावेळी दूध मुलीच्या श्वसनलिकेत दूर गेल्याने तिला ठसका लागला यातच तिला उलटी होऊन ती बेशुद्ध पडली अडीच महिन्याच्या चिमुकलीला घरातल्यांनी तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले
चिमुकलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने यादव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलीस नाईक वैभव डोंगरे अधिक तपास करत असून उमरज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे दरम्यान सातारा शहरांमध्ये सुद्धा सोमवारी एक वर्षाच्या मुलीचा अशा चॉकलेट अडकून मृत्यू झाला होता अशा प्रकारच्या घटना घडविण्यात यासाठी पालकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी केले आहे