महाराष्ट्रसातारा
विद्यमान आमदारांनी वीस वर्षांत काय केलं?
कुलदीप क्षीरसागर यांचा भर मेळाव्यात थेट सवाल
सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर मतदारसंघातून इच्छुक असलेले कुलदीप क्षीरसागर यांनी कराड उत्तर मध्ये बैठकांचा आणि संवाद मेळाव्यांचा झपाटा लावला असून ते कराड उत्तर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांनी जोरदार मोर्चे बांधणे सुरू केली, कराड उत्तर मतदारसंघातील 89 गावातील लोकांच्या गाठीभेटी घेत असताना कुलदीप क्षीरसागर यांना निवडणुकीसाठी लोकांच्या मधून उमेदवारी मिळावी अशी मागणी होत आहे
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा सातारा कोरेगाव खटाव आणि कराड या चार तालुक्यांचा मिळून एक विधानसभा क्षेत्र तयार झाले. परंतु या मतदारसंघांमध्ये सातारा कोरेगाव खटाव या तालुक्यातील प्रश्नांवर नेहमीच विद्यमान आमदारांनी कानाडोळा केला असून, ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होती, त्या प्रमाणात कामं न झाल्याने सातारा कोरेगाव खटाव तालुक्यातील लोक नाराज आहेत. नागठाणे मसूर उंब्रज वाठार कोपर्डे ही गाव बघता या गावांची प्रगती झाली नाही यामुळे या गावांचा नेमका काय विकास झालाय हे आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर एमआयडीसीमध्ये सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असतानादेखील या ठिकाणी कंपन्या नाहीत यामुळे स्थानिकांना रोजगार नाही एवढंच नाही, तर शिक्षणासाठी या परिसरातील युवकांना कराड किंवा सातारा या ठिकाणी जावे लागते.
या मतदारसंघात साधी युवकांच्या शिक्षणाची सोय नाही या ठिकाणी असलेले विद्यमान आमदार करू शकले नाहीत यामुळे म्हणावं लागेल. ना शिक्षणाची सोय, ना रोजगाराची संधी,ना रस्ते गेली 50 वर्षात नेमकं काय झालं ? असा सवाल कुलदीप क्षीरसागर यांनी विद्यमान आमदारांना विचारला आहे.
विद्यमान आमदार आणि महायुतीच खरंच साटंलोटं असेल, तर नुसतं झुंजवायचं म्हणून झुंजवू नका. नाहीतर मला कराड उत्तर मधून मला उमेदवारी द्यावी, नाहीतर विद्यमान आमदारांना बिनविरोध निवडून द्या उगीच निवडणुकीची नाटकं करू नयेत, अशी गंभीर स्वरूपाची टिका करत महायुतीतील नेत्यांचा कुलदीप क्षीरसागर यांनी समाचार घेतला, त्यानी दोन दोन वेळा विधानसभेला संधी घेतली. त्यांनी मन मोठं करून माझ्या पाठीशी उभं रहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले.