महावितरणच्या घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांच्या जिवाला ठेकेदाराकडून धोका?
सातारा :
जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पाचवड येथे महावितरण कंपनीचे शंकर कोळसे पाटील नावाचे कर्मचारी विजेच्या खांबावर काम करत असताना, दुचाकीवरून आलेल्या एकाने लाईन सुरू करुन पळून जाताना शेतात काम करणार्या महिलांनी पाहिले व आरडाओरडा केला, तोपर्यंत खांबांवर चढलेले कळसे पाटील विजेच्या धक्क्याने खाली पडले व त्यांच्या डोक्याला मार लागून हात मोडला तसेच हात पाय भाजले या घटनेत ते थोडक्यात बचावले.
या आधी देखील कळसे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी देखील ठेकेदारांच्या सहकार्या कडून देण्यात आली होती, यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून त्यांनीच तर हा जिवे मारण्याचा प्रयत्न केला नाही ना ?याचा तपास सातारा पोलिसांनी करावा अन्यथा शिवसेना आंदोलन करावे लागेल यास महावितरण तसेच पोलिस प्रशासन जबाबदार राहील असे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
तसेच संबंधित महावितरण घोटाळ्या संदर्भात ईडी कडे तक्रार दाखल करणार असून, खटाव मध्ये जो जिवघेण्याचा प्रकार घडला आहे याचा CIDमार्फत तपास व्हावा अशी मागणी मोहिते यांनी केली .
महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या पगारातून बेकायदेशीर कपात करुन घोटाळा केल्याची तक्रार दाखल करणार्या कर्मचारी यांच्यावर पाळत ठेवली जात असून पाठलाग देखील केला जात आहे , यामुळे तक्रार करणार्या सर्वांच्या जिवाला संबंधित ठेकेदाराकडून जिवाला धोका असल्याचा आरोप सचिन मोहिते व कंत्राटी कामगारांच्या कडून करण्यात आला आहे.