उस्मानाबाद (अभयकुमार देशमुख) :
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद येथे प्रलंबित पीक विमा, पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान त्वरित मिळावे, यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले. त्या उपोषणस्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भेट दिली.
या भेटीत शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,कृषीमंत्री अब्दुल सत्तार,पुनर्विकास विभागाचे अधिकारी धारुरकर व गुप्ता यांच्याशी फोनवर संवाद साधून संबंधित आमरण उपोषणा संदर्भात ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी भूमिका मांडली. यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना न्याय देणार असा शब्द दिला. त्यानंतर गेल्या ६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले आमदार कैलास पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत नारळ पाणी घेऊन काही दिवसांसाठी उपोषण स्थगित केले.