‘त्या’ १७ एकरवर दोन्ही राजेंचा दावा ; कार्यकर्त्यात राडा
सातारा (महेश पवार)
आज शिवेंद्रसिंहराजे बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करणार होते मात्र उदयनराजेंनी हा कार्यक्रम होण्याआधी त्या ठिकाणी उभ केलेलं शेड उध्वस्त केलं यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
दरम्यान यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील या ठिकाणी आले यामुळे परिसरातील वातावरण तनावाचे झालं व एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी झाली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांनी बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन करुन नारळ फोडला तर उदयनराजेंनी देखील जलजिवन योजनेच्या कामाचा नारळ फोडला व दोन्ही राजे या ठिकाणाहून निघून गेले.
मात्र संभाजीनगरच्या 17 एकर जागेवर दोन्ही राजेंनी केलेल्या दाव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.