google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

उदयनराजेंनी ठेवले शिवेंद्रराजेच्या मर्मावर बोट…

सातारा (महेश पवार):

सातारचे खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आरोप प्रत्यारोप आता टोकांवर गेले असून , उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी शिवेंद्रसिंहराजे यांच्या टिकेला उत्तर देताना थेट शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मर्मावर बोट ठेवत थेट पालिका निवडणुकीत घरातली का निवडून ? आली नाही म्हणत उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या जखमेवर मीठ चोळले.

उदयनराजे बोलताना म्हणाले यांची पात्रता काय, लायकी नाही . दुसऱ्याला कमी लेखून माणूस मोठा होत नाही माणूस स्वतःच्या कर्तुत्वाने मोठा होतो पैशाने माणसे मोठे होत नाही , यांच्या वडिलांपासून घरात सत्ता आहे आजवर तुम्ही केलं तरी काय ? असा सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी यांच्या काळात फक्त भ्रष्टाचार झाला लोकांच्या जीवावर संस्था स्थापन केल्या कुक्कुटपालन, अजिंक्य बाजार, महिला बॅंक असूदेत लोकांचे पैसे खाल्ले अशी लोक एवढ्या मोठ्या घराण्यांत जन्माला आले कसे , आमच्या दारात कोण पैसे मागायला येत नाही आणि आई बहिणी वरून शिव्या देत नाही, लोकांनी आयुष्य भर कमावलेली पुंजी तुम्ही हडप केली असल्याचा गंभीर आरोप उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर केला.

उदयनराजेंनी केलेल्या या गंभीर आरोपांवर आता शिवेंद्रसिंहराजे काय उत्तर देतात हे पहावं लागेल …

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!