google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

महावितरण घोटाळा प्रकरणी सोमनाथ गोडसे अटक

सातारा (महेश पवार):

महावितरण कंपनीच्या शेकडो कंत्राटी कामगारांच्या पगारातून कपात करून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा केलेप्रकरणी सोमनाथ गोडसे विरोधात सातारा पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमनाथ गोडसे नी सातारा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला परंतु तो जामिन अर्ज फेटाळला. यानंतर गोडसे नी मुंबई हायकोर्टात देखील जामिनासाठी अर्ज केला परंतु कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन तारखेदरम्यान सोमनाथ गोडसे यांनी अर्ज माघार घेतला व सातारा पोलीसांना शरण आला.

पोलिस अधीक्षक बन्सल यांचे मार्गदर्शनाखाली ,पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ व सहायक पोलिस निरीक्षक गुरव हे तपास करत असून गोडसे याला शनिवारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते व महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगार यांच्या लढ्याला यश आले असून, महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या पगारातून दरमहा कपात करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणारा गोडसे पोलीसांना शरण आल्यामुळे सातारा पोलिसांनी महावितरण मधील घोटाळ्याचा पर्दाफाश करून यात गोडसे ला पाठबळ देणारे काही राजकीय नेते ,जिल्ह्यातील त्याचे इतर सहकारी व या प्रकरणात सहभागी असणारे सरकारी महावितरण कंपनी अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा . अशी आशा सचीन मोहिते यांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!