‘परळी खोऱ्यात आ. शिवेंद्रसिंह राजेंच्या माध्यमातून इतिहास रचायचा आहे…’
परळी (महेश पवार) :
परळी खोऱ्यातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना येत्या विधानसभेमध्ये उच्चांकी मतदान करून आपल्याला इतिहास रचायचा आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांनी परळी येथे झालेल्या “बूथ प्रमुख शक्ती केंद्र” प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठकीत केले.
यावेळी सातारा विधानसभा विस्तारक विशाल वाळूजकर माझी माझी जिल्हा परिषद सदस्य भिकू भाऊ भोसले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश सावंत, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग देवरुखे इसुप पटेल, पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव ,वसंत भंडारे तसेच परळी खोऱ्यातील विविध गावचे सरपंच पदाधिकारी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी परळी ठोसेघर अरे दरे अंबवडे बुद्रुक लावंघर परिसरातील सत्तर बूथ प्रमुख उपस्थित होते.
राजू भोसले पुढे म्हणाले परळी खोऱ्यात दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांचा वारसा आमदार शिवेंद्रसिंहराजे यशस्वीपणे चालवत आहेत प्रत्येक वाडीवस्तांपर्यंत थेट जनतेशी संपर्क असल्यामुळे त्यांच्या अडीअडचणीत सुखदुःखात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सहभागी होतात आ .शिवेंद्रसिंहराजे यांनी गाव तिथे विकास हे धोरण अवलंबून प्रत्येक गावात लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत .त्यामुळे आ.शिवेंद्रसिंहराजे म्हणतील तेच धोरण ते म्हणतील तू आदेश मानून आपल्याला आत्तापासूनच कामाला लागायचे आहे. मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. आपल्या समोर प्रतिस्पर्धी कोण आहे हेही आपल्याला ठाऊक नाही विरोधकांचा दररोज नवीन चेहरा समोर येत आहे.
सातारा विधानसभा विस्तारक विशाल वाळुंजकर यांनी बूथ प्रमुख यांना विस्तृत मार्गदर्शन करत बूथ प्रमुख हा कशाप्रकारे शक्ती केंद्र असतो हे सविस्तर सांगितले.
उपस्थित बूथ प्रमुख यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ज्याप्रमाणे गावोगावी विकास कामे पोहोचवली आहेत आमचा आर्थिक स्तर उंचावला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही आतापासूनच आ. शिवेंद्रसिंह राजे सांगतील तेच धोरण म्हणून कामासाठी लागलो आहोत असा निर्धार व्यक्त केला.