पालक मंत्र्यांच्या मतदारसंघात पेयजल योजनेत लाखोंचा घोटाळा ?
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाटण विधानसभेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात येणाऱ्या बांबवडे गावत पेयजल योजनेतून 53लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे समोर आले.
यामुळे गावातील निवृत्त पोलीस अधिकारी काकासो जाधव यांनी पेयजल योजनेत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला असून झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून या टाकीला नेमकी कशी आणि कुठे गळती लागली, तसेच 53 लाख रुपये कुठे गेलं याची विचारणा करत आहेत . यामुळे यात सहभागी असलेल्या कदम साहेब तसेच गावातील सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार केला असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करून, याठिकाणी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी पाडून पुन्हा बांधून देण्याची मागणी जाधव यांनी केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे . यामुळे जिल्हा प्रशासनान नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याच मतदारसंघातच पेजल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले यामुळे संबंधित अधिकारी तसेच ठेकेदारावर पालकमंत्री काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले.